मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी

मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्रातील महान कवी आणि साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याच्या विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, ज्यामुळे मराठी भाषेचा गौरव वाढला. महाविद्यालयातील कला विभागाने यावर्षी २८ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमात ओवी, अभंग, पोवाडे, कविता, भाषणे, नृत्य कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्व दाखवून दिले.

Latest News