संतांची अभंगवाणी वाचन आणि लेखन

आषाढी एकादशीनिमित्त ‘संतांची अभंगवाणी वाचन आणि लेखन’ हा कार्यक्रम सेठ हिराचंद मुथा महाविद्यालयात, कला विभाग आणि मराठी वाड्.मय मंडळातर्फे २३जुलै २०२६ रोजी घेण्यात आला.

या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना आषाढी वारी म्हणजे काय? व वारी मधील अनुभव सांगणे.तसेच भक्ती संप्रदायाची, मराठी संत साहित्याची ओळख करून देणे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि सांस्कृतिक वारशाचा परिचय करून देणे.विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी वाढवणे त्यांचे भाषण कौशल्य व वाचन कौशल्य तसेच सादरीकरण कौशल्याचा विकास वाढवणे या कार्यक्रमाचा उद्देश होता.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संतांचे अभंग गायले व वाचून दाखवले व त्यांचा अर्थ सांगितला व संतांविषयीची माहिती सांगितली. विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम खूप आवडला व त्यांनी हा कार्यक्रम आनंदात साजरा केला.

Latest News