सेठ हिराचंद मुथा महाविद्यालय कला

सेठ हिराचंद मुथा महाविद्यालय कला, वाणिज्य आणि सायन्स येथे २७ फेब्रुवारी २०२६ , शुक्रवार रोजी कला विभाग आणि मराठी वाङ्मय मंडळातर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री प्रकाश मुथा, प्राचार्या अनुजा ब्रह्म आणि IQAC समन्वयक डॉ. अजय पिल्ले, मराठी विषयाच्या शिक्षिका कविता भागवत, प्रगती व्हटकर तसेच इतर शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यांचा समावेश होता.

या कार्यक्रमात मराठी विषयाची महती सांगणारे, मराठी विषयाचा अभिमान बाळगायला लावणारे आणि मराठी बोलण्यास प्रवृत्त करणारे भाषण, कविता, चित्रपटातील गीते, भक्ती गीते, प्रार्थना आणि इतर कवींच्या कविता विद्यार्थी आणि शिक्षकांनी सादर केल्या. मराठी नृत्यामधून मराठी संस्कृतीचे दर्शन घडले. तसेच सादर झालेल्या ‘रंग साहित्याचे’ या नाटकातून कवी कुसुमाग्रज आणि मराठी साहित्य प्रकाराची ओळख करून देण्यात आली. अशाप्रकारे महाविद्यालयात विविध रंगांनी भरलेला असा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सादर झाला.

Latest News